आम्हाला कनेक्ट व्हा…
ताज्या बातम्या
उपक्रम
प्रवासी सहाय्यता कक्ष
श्री गौरी गणपती जादा तसेच इतर यात्रांच्या वेळी या संस्थेमार्फत प्रवाशांसाठी प्रवासी सहाय्यता कक्ष उभारण्यात येते. यामध्ये प्रवासी वर्गाला कोणती बस कुठे लागणार आहे, बसची सुटण्याची वेळ, तसेच वाहतूक नियोजन करणे इत्यादी बाबतीची कामे प्रवासी सहाय्यता कक्ष मार्फत करण्यात येतात.
मार्गफलक भेट
संस्थेमधील सदस्यांकडून एसटी मार्गावरील आवश्यक असलेल्या मार्गावर मार्गफलक उपलब्ध करून देणे. तसेच खराब झालेले मार्गफलक पुन्हा रंगकाम करुन देण्याचे काम करण्यात येते.
एसटी बस सजावट
उत्सवानिमित्त सोडण्यात येणाऱ्या जादा वाहतूकीच्या एसटी बसेस प्रवाश्यांच्या नजरेत पडण्याकरिता एसटी बस त्या उत्सवास अनुसरुन एसटी बसची आकर्षक सजावट करणे तसेच रंगकाम करून घेणे इत्यादी…