-: कार्यपध्दती :-
-: कार्यपध्दती :-
कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे कार्यक्षेत्र
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळामधील मुंबई प्रदेश कोकण विभागाअंतर्गत येणाऱ्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभागामध्ये ही संस्था कार्यरत आहे .
या संस्थेमध्ये कार्यरत विविध कामे
· प्रवासी वर्गापर्यंत एसटी विषयी जनजागृती
करणे.
· एसटी बाबत जाहिरात प्रसिध्द करणे.
· मार्गफलक उपलब्ध करुन देणे.
· सणा निमित्त एसटी बसची सजावट करणे.
· हंगामी कालावधी मध्ये प्रवासी सहाय्यता
कक्ष उभारणे.
· एखाद्या मार्गावरील बसची सद्यस्थिती
परिवहन कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचणे.
प्रवासी वर्गापर्यंत एसटी विषयी जनजागृती करणे.
लालपरीचा प्रवास किती सुलभ आणि स्वस्थ आहे तसेच एसटी मार्फत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी पास, कामगार पास, जेष्ठ नागरिक सवलत , आवडेल तिथे प्रवास याबाबतची माहिती प्रवासी वर्गापर्यंत थेट पोहचविणे. हे मुख्य उदिष्ट आहे.
एसटी बाबत जाहिरात प्रसिध्द करणे.
एखाद्या आगारामार्फत नवीन मार्गावरील एसटी बससेवा सुरू झाल्यास एसटी बस कोणत्या मार्गे जाणार त्याचा तपशिल त्याबाबतचे वेळापत्रक, आगाराचे संपर्क क्रमांक, तिकीट बुकींग बाबतची माहिती तयार करणे व प्रवाश्यांना ठळकपणे दिसण्याकरीता जाहिरात प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचविणे.
मार्गफलक उपलब्ध करुन देणे.
कधी कधी अशी वेळ येते की, एसटी बस वरील मार्गफलकाचा वारंवार वापर होऊन त्याची झीज होते त्यामुळे एखाद्या मार्गवरील प्रवाश्यांना मार्गे नीट पाहता येत नाही. ही बाब या संस्थेच्या निदर्शनास आल्यापासून बसस्थानकांमधील वाहतूक नियंत्रक यांच्याकडून आवश्यक मार्गफलकांची यादी घेवून संबंधित मार्गावरील मार्गफलक देण्याचे काम केले जाते.
एसटी बस सजावट करणे.
गणेशउत्सव, दिपावली, दसरा, गुढीपाडवा, या सणांचे औचित्त साधून त्या प्रमाणे एसटी बस सजावट करून त्या सणाचे वैशिष्टये प्रवाशी वर्गापर्यंत पाहोचणे.
प्रवासी सहाय्यता कक्ष
गणेशउत्सव, यात्रा स्पेशल, वारी अश्या वेळी बसस्थानकांमधील गर्दी पाहता ठीकठिकाणी कोकण एसटी प्रेमी द्वारे प्रवासी सहाय्यता कक्ष उभारण्यात येते. यात मुख्यता प्रवाश्यांना बसची माहिती देणे कोणती बस किती वाजता व कोणत्या फलाटावर लागणार याची माहिती पोहचविण्याचे काम करण्यात येते.