कोकण एसटी प्रेमी ग्रुपचा वतीने हातीस येथे होणाऱ्या उरूस निमित्त प्रवासी सहाय्यता कक्ष उभारण्यात आले होते. कोकण एसटी प्रेमी ग्रुपकडून एसटीच्या चालक, वाहक व अधिकारी वर्ग व रत्नागिरी पोलिस यांचा सत्कार व सहकार्य केल्याबद्दल आभार मान्यत आले.
|| श्री अष्टविनायक दर्शन २०२३ ||
कोकण एसटी प्रेमी ग्रुपचा वतीने आयोजन करण्यात आलेल्या " श्री अष्टविनायक दर्शन " बससेवेचा शुभारंभ दिनांक : २६ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आला. सदर सेवा ह्या लांजा व दापोली येथून सोडण्यात आल्या होत्या. ग्रुपचा ह्या आभुतपुर्व उपक्रमांची हे प्रथम वर्ष होते . प्रवाशांनी दाखवलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल कोकण एसटी प्रेमी ग्रुपकडून सर्वांचे मनःपुर्वक आभार...असचं सहकार्य लाभो हीच प्रार्थना....
१ जुन, एसटी वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात आलेले विविध उपक्रम
कोकण एसटी प्रेमी ग्रुप व आपल्या लाडक्या लालपरीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात खेड आगारामध्ये साजरा करण्यात आला. ह्यावेळी खेड आगार व्यवस्थापक व इतर अधिकारी वर्ग, एसटी कर्मचारी, प्रवासी वर्ग व कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते..
दिवाळी सणानिमित्त एसटी बसेस आकर्षक दिसण्याकरिता रंगकाम करण्यात आलेली रत्नागिरी शहरी वाहतूकीमधील एसटी बस
चिपळुण येथे २०२० रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरग्रस्त नागरिकांना "एक हात मदतीचा" हे ब्रिदवाक्य घेऊन मदत करण्यात आली.
७५ व्या सुवर्ण अमृत महोत्सवाचे अवचित्त साधून रत्नागिरी शहरी वाहतूकीमधील बसची सजावट करण्यात आली.
प्रवासी सहाय्यता कक्ष